मोठी संधी! पंजाब नॅशनल बँकेत 350 रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा
PNB Recruitment 2025: Big Opportunity!
पंजाब नॅशनल बँकेत नोकरी3 करण्याची एक मोठी संधी समोर आली आहे. बँकेत ऑफिसर क्रेडिट, ऑफिसर इंडस्ट्री, मॅनेजर आयटी, आणि सिनियर मॅनेजर या पदांसाठी ३५० रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी www.pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
भरतीत क्रेडिट ऑफिसर पदासाठी २५०, इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी ७५ आणि आयटी मॅनेजर व सिनियर आयटी मॅनेजर पदांसाठी प्रत्येकी ५ जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांना अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील लोकांना ₹८०० शुल्क तर राखीव प्रवर्गासाठी ₹१५० शुल्क भरावे लागेल.
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत द्वारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत रिजनिंग, गणित, इंग्रजी आणि प्रोफेशनल नॉलेज संबंधित प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. अधिक माहितीसाठी recruitmentho@pnb.co.in या ईमेलवर संपर्क साधा.