खुशखबर! भारतीय सैन्यात डायरेक्ट “अधिकारी” बनण्याची सुवर्णसंधी! – अर्ज सुरु!
Opportunity to Become an Indian Army Officer!
भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशसेवेबरोबरच चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्करात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, अधिकृत वेबसाइटवर यासंबंधी माहिती जाहीर करण्यात आली आहे.
रिक्त पदांचा तपशील:
भारतीय लष्कराकडून एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी भरती सुरू आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (नॉन-टेक्निकल) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
एकूण रिक्त पदे – 70
- एनसीसी पुरुष (सामान्य) – 63 पदे
- एनसीसी पुरुष (विशेष) – 7 पदे
- एनसीसी महिला (सामान्य) – 5 पदे
- एनसीसी महिला (विशेष) – 1 पद
पात्रता:
- वयोमर्यादा: 19 ते 25 वर्षे (1 जुलै 2025 पर्यंत गणना केली जाईल)
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी आवश्यक. अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात, मात्र त्यांना मागील वर्षांमध्ये 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
पगार:
भारतीय सैन्यात निवड झाल्यास उमेदवारांना ₹56,100 ते ₹2,50,000/- पर्यंत वेतन मिळू शकते.
निवड प्रक्रिया:
- उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- एसएसबी मुलाखत (प्रयागराज, भोपाळ, बेंगळुरू आणि जालंधर येथे).
- एसएसबीमध्ये यशस्वी झाल्यास वैद्यकीय चाचणी.
- मुलाखतीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
15 मार्च 2025 (joinindianarmy.nic.in वर ऑनलाईन अर्ज उपलब्ध).
ही एक उत्तम संधी असून इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा!