ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानविरुद्ध मोहिम अजूनही सुरूच! | Operation Sindoor: Mission Still Active!

Operation Sindoor: Mission Still Active!

पाकिस्तानच्या वाघा-अटारी सीमेवरील “बीटिंग द रीट्रिट” सह संध्याकाळचे सर्व औपचारिक कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय सीमा सुरक्षा दलाने (BSF) घेतला आहे. पंजाबमधील वाघा-अटारी (अमृतसर), फिरोजपूर येथील हुसैनीवाला आणि फाजिल्का जिल्ह्यातील सदकी या ठिकाणी बीएसएफचे जवान दररोज संध्याकाळी पाकिस्तान रेंजर्ससोबत भारतीय ध्वज खाली उतरवतात. मात्र, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यक्रमावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

Operation Sindoor: Mission Still Active!

सर्वपक्षीय पाठिंबा आणि एकमताची भूमिका!
पाकविरोधी मोहिमेबाबत राजकीय एकता साधण्यासाठी संसदीय ग्रंथालयात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सर्व नेत्यांनी एकमताने सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शवला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सीमावर्ती भागातील सुरक्षिततेसाठी सर्व नेत्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. दहशतवादाविरोधातील लढाईत राष्ट्र एकवटलेले असून सरकारच्या निर्णयास एकमुखाने पाठिंबा देण्यात आला.

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच!
केंद्र सरकारने स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेली कारवाई अजूनही सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, या हल्ल्यांमध्ये किमान 100 पेक्षा अधिक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले आहेत.

पंतप्रधान उपस्थित नसल्याची खंत!
सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल काँग्रेस पक्षाने खंत व्यक्त केली. खर्गे यांनी सांगितले की, “दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहून मत व्यक्त करायला हवे होते.”

सीमावर्ती नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर!
बैठकीत नेत्यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व नेत्यांनी या मुद्द्यावर एकमुखाने समर्थन दर्शवले.

जागतिक स्तरावर मोहीम सुरू करण्याची मागणी!
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (AIMIM) चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) विरोधात भारताने जागतिक स्तरावर मोहीम उभारावी अशी मागणी केली. त्यांच्या मते, हा दहशतवादी गट भारताच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका आहे.

मोहिम अद्याप पूर्ण न झाल्याचे सरकारचे स्पष्टीकरण!
‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असल्याने मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा सांगणे शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. “जर पाकिस्तानने आणखी चिथावणी दिली, तर त्याला तितक्याच कठोरपणे उत्तर दिले जाईल,” असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. या मोहिमेमुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.