जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू!
Online Transfer Process for Zilla Parishad Teachers Begins!
राज्य सरकारच्या सुधारित धोरणानुसार, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आता ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीर केले असून, २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी निश्चित होणार आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रीकरणासाठी तालुकास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खोटी माहिती भरल्यास होणार कारवाई!
बदलीसाठी दिशाभूल करणारी माहिती भरल्यास शिक्षकांचे निलंबन होणार असून, शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. यासोबतच संबंधित तालुकास्तरीय समितीलाही जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदल्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
बदली प्रक्रियेचे वेळापत्रक:
- १ जानेवारी – २८ फेब्रुवारी: पात्र शिक्षकांच्या यादीचे प्रसिद्धीकरण, हरकती आणि अंतिम यादी निश्चिती.
- १ मार्च – ३१ मे: रिक्त पदांची निश्चिती, पसंतीक्रम नोंदणी आणि टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रिया.
- २८-३१ मे: अवघड क्षेत्रांतील रिक्त पदे भरणे.
शिक्षकांनी या ऑनलाइन प्रक्रियेत सहभाग घ्यावा आणि अचूक माहिती भरून बदल्या पारदर्शकपणे पार पडतील याची काळजी घ्यावी.
jalna zila parishad teacher to pune mahanagar palika teacher transfer latest information