राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च निश्चित केली आहे. मात्र, तालुक्यात ७९ हजार लाभार्थ्यांनी अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ मोबाइल अॅप विकसित केले असून, याद्वारे लाभार्थी घरी बसूनही केवायसी करू शकतात. ३१ मार्चनंतर केवायसी पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांनाच धान्य वाटप होणार आहे, त्यामुळे वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरण न झाल्यास संबंधितांचे नाव शिधापत्रिकेतून काढले जाईल.
तालुक्यात आतापर्यंत ६५% लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर उर्वरित नागरिकांनी लवकरात लवकर ती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना रास्तभाव दुकानांपर्यंत जाणे शक्य नाही, त्यांनी ‘मेरा ई-केवायसी’ अॅपद्वारे घरी बसूनच प्रक्रिया पूर्ण करावी.
या गावांमध्ये केवायसीचा वेग मंद
पिंप्रीराजा, पिसादेवी, ओहर, गाढेजळगाव, देवळाई, वडगाव, कोल्हाटी, पंढरपूर, टाकळीमाळी, पळशी, वरुड काजी, सातारा खंडोबा, दौलताबाद आणि गोलवाडी या गावांमध्ये ५०% पेक्षा कमी लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
३१ मार्च ही अंतिम मुदत आहे, वेळेत ई-केवायसी करा आणि शिधापत्रिकेवरील हक्काचे धान्य मिळवा!