नवी मुंबई महापालिकेच्या ‘गट-क’ आणि ‘गट-ड’ भरतीला अभूतपूर्व प्रतिसाद – ६६८ पदांसाठी तब्बल ८४ हजार अर्ज! | Massive Response to NMMC Recruitment – 84,000 Applications!

Massive Response to NMMC Recruitment – 84,000 Applications!

नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या सरळसेवेच्या भरती प्रक्रियेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे. महापालिकेच्या विविध विभागांतील ‘गट-क’ आणि ‘गट-ड’ मधील ३० विविध संवर्गांमध्ये एकूण ६६८ रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात २८ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२५ होती, आणि त्यापर्यंत तब्बल ८४,००० अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर प्राप्त झाले आहेत.

Massive Response to NMMC Recruitment – 84,000 Applications!

विविध खात्यांमध्ये भरतीची संधी
ही भरती नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा-वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य आणि निमवैद्यकीय विभागांमध्ये होणार आहे. यामुळे या संधीला केवळ शहरापुरती मर्यादा राहिलेली नाही, तर राज्यभरातून इच्छुक उमेदवारांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.

लिपिक व स्टाफ नर्स पदांसाठी सर्वाधिक अर्ज
या भरतीत लिपिक टंकलेखक (135 पदे) आणि स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (GNM) (131 पदे) या दोन संवर्गासाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. त्याखालोखाल लेखा लिपिक (58), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (51), ANM (38), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (35), वॉर्डबॉय (29), कक्षसेविका/आया (28), शस्त्रक्रियागृह सहाय्यक (15), आरोग्य सहाय्यक महिला (12), औषध निर्माता (12), वैद्यकीय समाजसेवक (15) इत्यादी पदांचा समावेश आहे.

दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावधगिरी बाळगा!
महापालिकेने स्पष्ट केलं आहे की भरती प्रक्रियेबाबत दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून उमेदवारांनी स्वतःला दूर ठेवावं. भरतीसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती केवळ https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरच दिली जाईल. तसेच, महापालिकेचे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेज नियमितपणे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांसाठी सूचना
भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी महापालिकेने नियमबद्ध आणि टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीचे पालन करावे.

आयुक्तांचे आवाहन
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उमेदवारांना आवाहन केलं आहे की त्यांनी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि अफवांपासून दूर राहून भरती प्रक्रियेमध्ये प्रामाणिक सहभाग घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.