पंढरपूरसाठी नवी एक्सप्रेस!-New Express Train to Pandharpur!
New Express Train to Pandharpur!
रेल्वे प्रवाशांनो, एक दमदार बातमी आहे! या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी एक खास ट्रेन सुरू होणारे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ही विशेष एक्सप्रेस गाडी ५ जुलै २०२५ रोजी नागरसोल ते मिरज दरम्यान चालवली जाणारे.
ही ट्रेन छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार असून, १६ महत्त्वाच्या स्टेशनांवर थांबा देण्यात आलेला आहे.
वेळापत्रक कसं असेल?
गाडी नं. 07515 – नागरसोल वरून रात्री ७ वाजता सुटणार आणि दुसऱ्या दिवशी मिरज स्टेशनला दुपारी 3:55 वाजता पोहोचणार.
छत्रपती संभाजीनगर येथे ही गाडी रात्री 8:30 वाजता थांबणार आहे – थांबा ५ मिनिटांचा.
परतीची गाडी नं. 07516 – मिरजवरून ६ जुलै रोजी सायंकाळी 5:25 ला सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:00 वाजता नागरसोलला पोहोचणार.
कोणकोणत्या स्टेशनवर थांबा?
नागरसोल, रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुडूवाडी, पंढरपूर
वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता ही सेवा फारच उपयोगी ठरणार आहे. मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले प्रवासी यामुळे सुटकेचा निःश्वास टाकतील हे नक्की!