नवी मुंबई महापालिकेच्या सरळसेवा भरती परीक्षा जुलैमध्ये होणार !-Navi Mumbai Exams in July!

Navi Mumbai Exams in July!

नवी मुंबई महापालिकेच्या सरळसेवा भरतीबाबत मोठा खुलासा झालाय. एकूण ६६८ पदांसाठी सुरू असलेल्या भरतीसाठी तब्बल ८४ हजार ७७४ उमेदवारांनी अर्ज केलाय! आता या भरतीची परीक्षा १५ ते २१ जुलै २०२५ दरम्यान ऑनलाईन होणार हे ठरलंय.

Navi Mumbai Exams in July!पालिकेनं जाहीर केलं की परीक्षेचं वेळापत्रक ठरवून टाकलाय. पात्र उमेदवारांना लवकरच हॉलतिकीट मिळणार आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रं असणार.

पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी परीक्षेचं वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवायचा निर्णय घेतलाय. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून पोलिस तैनात करायची विनंती केली आहे.

त्याचबरोबर भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, असं आवाहनही प्रशासनानं केलंय. कोणीही खोटी आश्वासनं देत असेल, तर त्याची लगेचच माहिती द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.