नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! नाशिकमध्ये ‘या’ विभागात भरती !थेट मुलाखत
Nashik Vacancy 2025 !
चांगली नोकरी मिळावी म्हणून अनेकजण प्रयत्न करत असतात. काहींना लगेच संधी मिळते, तर काहींना वाट पाहावी लागते. पण जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे! महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथे विविध रिक्त पदांसाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी आणि शिक्षक/निदर्शक या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. एकूण ७८ रिक्त पदं भरली जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांनी नाशिकमध्ये जाऊन सेवा द्यावी लागेल. उमेदवारांची निवड १७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एम.डी./एम.एस./डीएनबी किंवा एमबीबीएस ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६९ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही भरती पूर्णतः मुलाखतीवर आधारित असल्याने उमेदवारांना कोणत्याही लेखी परीक्षेची आवश्यकता नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार दिला जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mpgimer.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी डॉ. डी.जी. डोणगावकर हॉल, पहिला मजला, MUHS, नाशिक, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४ या ठिकाणी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी हजर राहावे.