आनंदाची बातमी !! नाशिक महानगरपालिकेत पदोन्नतीला मंजुरी!

Nashik Municipal Promotions Approved!

नाशिक महानगरपालिकेच्या महासभेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांना मंजुरी देतानाच रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Nashik Municipal Promotions Approved!

महासभेने एकूण १६ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली, तर ९ अधिकाऱ्यांची पदोन्नती नाकारली. विशेषतः रवींद्र धारणकर यांची भुयारी गटार व मलनिस्सारण अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती झाली आहे. मागील वर्षभर विविध निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली होती. याशिवाय, काही अधिकाऱ्यांच्या प्रकरणांमुळे न्यायालयीन अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आयुक्त मनीषा खत्री यांनी पदोन्नती प्रक्रियेस गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी नियुक्त केलेल्या समितीने आवश्यक कागदपत्रे, सेवा ज्येष्ठता आणि तांत्रिक बाबींची पडताळणी केल्यानंतर अखेर ही प्रक्रिया मार्गी लागली. महिनाभरापूर्वी हा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार होता, मात्र काही कारणास्तव तो मागे घेण्यात आला. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती.

पदोन्नती मिळालेले अधिकारी:

  • अधीक्षक अभियंता: रवींद्र धारणकर (मलनिस्सारण व पाणीपुरवठा)

  • कार्यकारी अभियंते: रवींद्र पाटील, प्रकाश निकम, संजय आहेसरा, नवनीत भामरे, विशाल गरुड, रवींद्र बागूल

  • वाहतूक शाखा: नरेंद्र शिंदे

ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे महापालिकेतील प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.