खुशखबर! – नमो शेतकरी महासन्मान योजनेचा ५ वा हप्ता मिळण्याची तारीख ठरली!

Namo Shetkari Mahasanman Yojana Nivad Yadi 5th Paymanet


जिल्ह्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचे चार लाख ५९ हजार ३१७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दोन सप्टेंबरपर्यंत चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी शासनाने तयारी केली आहे. शेतकऱ्यांचा गौरी-गणपती सण गोड होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) गौरी-गणपती सणाला १८३७ कोटी २७ लाख रुपये मिळणार आहेत. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Yojana) चौथा आणि पाचवा हप्ता दोन सप्टेंबरला देण्यासाठी शासनाची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील चार लाख ५९ हजार ३१७ शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत.

Namo Shetkari Mahasanman Payment List

 

पी. एम. किसानच्या धर्तीवर राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचे चार लाख ५९ हजार ३१७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दोन सप्टेंबरपर्यंत चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी शासनाने तयारी केली आहे. अशी माहिती कृषी खात्यातील (Agriculture Department) सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील वंचित १६९१ आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर अपडेट करण्याचे काम सुरू आहे. चौथा आणि पाचवा हप्ता मिळवून चार हजार रुपयींप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १८३७ कोटी सत्तावीस लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे गौरी गणपतीच्या सणाला खर्चाला पैसे उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, केंद्र शासनाच्या वतीने ९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या दुरदृश्‍‍य प्रणालीद्वारे पी. एम. किसानचा लाभ न मिळालेल्या वंचित १६९१ शेतकऱ्यांना मोबाईल लिंक ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अपडेटमुळे नमो सन्मान योजनाचाही हप्ता वंचित लाभार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

 

काही शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक नातेवाइकांचे, मित्रांचे दिले आहेत किंवा मोबाईल क्रमांक बदललेले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. या शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे काम सुरू आहे. नमो सन्मान योजनेचा लाभ घेताना मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर पी. एम. किसान योजनेचाही लाभ या वंचित लाभार्थ्यांना मिळणार आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.