नाईक शिक्षणाची झेप!-Naik Education Soars!

Naik Education Soars!

सुरुवातीला वंजारी बोर्डिंग म्हणून ओळख असलेली ही संस्था आज क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था म्हणून परिचित झाली आहे. दुर्गम भागात शिक्षण पोचवणं असो, की शहरी विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी योग्य आधार देणं – संस्थेचं काम वेगात सुरू आहे.

Naik Education Soars!शहराच्या गंगापूर रोडवर भरवस्तीत वसलेलं शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच ठरतंय. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष उदय घुगे आणि सहचिटणीस दिगंबर गिते यांनी ‘सकाळ ज्ञानवाटा’ उपक्रमात संस्थेच्या कामगिरीबद्दल माहिती दिली.

संस्थेचा गौरवशाली इतिहास

१९५३ साली डोंगरे वसतिगृह म्हणून नोंदणी झालेली ही संस्था १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ शिक्षण संस्थेत रूपांतरित झाली. वसंतराव नाईक यांचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आजही प्रेरणादायक आहे.

७० शाखा, २५ हजार विद्यार्थी, १२०० सेवक

संस्थेच्या ७० शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतायत. सुमारे ८० डॉक्टरेट प्राध्यापक संस्थेशी संलग्न आहेत, त्यातल्या ५० जण कॉलेज स्तरावर संशोधन व अध्यापन करतायत.

वाढत्या शैक्षणिक संधी आणि संकुल विस्तार

गंगापूर रोडवरील संकुलात सात मजली वसतिगृह, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, आधुनिक कार्यालयं उभी राहत आहेत. मानोरीम्हसरूळ परिसरात नर्सिंग, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरु होणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी कॅरिअर मार्गदर्शन, स्पर्धा, संशोधन आणि उद्योजकतेचा मार्ग

संस्थेने शहरी-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून मार्गदर्शन देण्याची पद्धत स्वीकारली आहे. याशिवाय, वसंत करडक, आविष्कार स्पर्धा, करिअर गाईडन्स, कबड्डी प्रीमिअर लीग अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे कौशल्यही वाढवलं जातंय.

संशोधन केंद्र आणि पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू

संस्था केवळ पदवीपर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर पीएच.डी. संशोधन केंद्र सुरू करून समाज, साहित्य, विज्ञान क्षेत्रात संशोधनालाही चालना दिली आहे.

वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचवणारा ध्यास

दिगंबर गिते यांनी सांगितलं की, संस्थेच्या यशामागे समाजातील दानशूर मंडळी, मार्गदर्शक, आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांची विद्यार्थी शोधमोहीमपुस्तक वितरण उपक्रम राबवले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.