आचार संहितेमुळे ‘मुख्यमंत्री वयोश्री’ला ब्रेक लागणार, महत्वाचा अपडेट जाहीर!
Mukhyamantri Vayoshri Yojana
राज्यातील ६५ वर्षे पूर्ण झालेल्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशकायगा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच त्यांचे मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंडाद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अवाचित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला. दोन लाखापर्यंत वार्षिक उत्पत्र असलेल्या ६५ वर्षे पूर्ण व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजने (Mukhyamantri Vayoshri Yojana) अंतर्गत ८ ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पण, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ लागू राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच राज्यात लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत त्याचे उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनीच काटेकोर दक्षता घ्यावी.
६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात १९ ऑगस्टला सुधारणा करण्यात आली. ८ ऑक्टोबरपासून ज्येष्ठांकडून अर्ज स्वीकारणे सुरु झाले अर्ज करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती, पण १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि योजनेअंतर्गत अर्ज देण्यावर निर्बंध घालण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने त्यासंदर्भातील पत्र काढून आबारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे पत्र सर्वच सहायक आयुक्तांना पाठविले आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी करीत नवीन अर्ज घेणे बंद करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३६ हजार ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केले आहेत, पण त्यातील अवाप्या सहा हजार जणांनाच लाभ मिळाला आहे. उर्वरित लाभायाँना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही.