आंदोलन सुरु असताना MSRTC कडून एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात!

MSRTC Recruitment SSC Pass


राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. 7 तारखेपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी लगबग सुरु केली. पण एसटीच्या संपामुळे त्यांना आपल्या आनंदाला मुरड घालावी लागलीय (MSRTC Recruitment SSC Pass). अनेकांनी एसटीचे रिझर्व्हेशन केले आहे पण एसटी बंद असल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. एकीकडे आपल्या मागण्यांसाठी एसटी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत तर दुसरीकेडे एसटी महामंडळात भरती जाहीर करण्यात आली आहे. 

एसटी महामंडळात चालक पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या संप सुरु असताना एसटी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं आता एसटीची कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यासाठी जाहीरात निघाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात आहेत.

MSRTC Bharti 2024 Details

एसटी महामंडळात चालक पदाची भरती केली जात आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालकाचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच त्याला अवजड वाहन किंवा प्रवासी वाहतूकीचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा. तसेच त्याच्याकडे पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थाना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबधीतांनी आपले अर्ज महाव्यवस्थापक (वाहतूक) महामंडळ, रा.प. मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे पाठवायचे आहेत. यासाठी 02223023900 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.