एमपीएससीमार्फत वैद्यकीय प्राध्यापक भरती!-MPSC to Fill Medical Faculty Posts!

MPSC to Fill Medical Faculty Posts!

मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार वैद्यकीय कॉलेजांमधून आणि नायर दंत महाविद्यालयात एकूण ५८७ पदं रिकामी आहेत. या रिक्त जागांमध्ये प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आता ही सगळी भरती एमपीएससीमार्फत होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली.

MPSC to Fill Medical Faculty Posts!सध्या काही काम थांबू नये म्हणून, ३४७ पदं कंत्राटी तत्त्वावर भरलेली आहेत. पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता.

उदय सामंत म्हणाले, नॅशनल मेडिकल कौन्सिल दर तीन महिन्यांनी नियम बदलते आणि हे नवीन नियम सरकारच्या धोरणात आणायला वेळ लागतो – म्हणूनच भरतीला उशीर होतो. मात्र, येत्या काळात महापालिकेला स्पष्ट सूचना दिल्यात की नियम बदलताच शासनाचे नियमही तत्काळ बदला – गरज भासल्यास विधेयक आणून त्यावरही निर्णय घ्या.

जिल्ह्यातल्या वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रतिनियुक्तीऐवजी थेट भरती केली जावी, यावरही विचार सुरू आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग योग्य ती तत्काळ कारवाई करणार असल्याचंही मंत्री सामंतांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.