MPSC ची संयुक्त परीक्षेची जाहिराती संदर्भात आयोगाने सांगितली नवीन महत्वाची माहिती!

MPSC Prelims Exam Latest Update


सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त गट-ब आणि गट-क २०२४ च्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षार्थी आतुरतेने वाट बघत आहेत. वर्ष उलटूनही अद्याप पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असून शासनाकडून सुधारित मागणीपत्र ‘एमपीएससी’ला अद्याप प्राप्त न झाल्याने संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडली आहे. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने पदे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचेही मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. या संदर्भातील एक परिपत्रक MPSC द्वारे जाहीर करण्यात आले आहे.

MPSC Prelims Exam Latest Update

आपल्याला माहीतच असेल MPSC दरवर्षी राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा आयोजित करते. मागील वर्षी सात हजारांहून अधिक जागांसाठी जाहिरात आली होती आणि एप्रिल २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली. यावर्षीही जवळपास आठ हजार जागांसाठी जाहिरात येईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील लाखो उमेदवाराने आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये तयारी करत आहेत. यासाठी त्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. हे सर्व उमेदवार नवीन जाहिरातीची वाट बघत आहे.

मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर अनेक जाहिराती आणि मागणीपत्रांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठीच्या (SEBC) नव्या आरक्षणानुसार पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल असे आयोगाने सांगितले होते. मात्र, सप्टेंबर उजाडूनही अनेक शासकीय विभागांकडून मागणीपत्र न आल्याने जाहिरात देता येणार नाही असे MPSC ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृह विभागाने लवकर पोलीस उपनिरीक्षक पदाचे मागणीपत्र पाठवावे अशी मागणी केली जात आहे. तसेच हि निवडप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशी  मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.