कृषी सेवा पदांच्या परीक्षेसाठी MPSC कडून भरती प्रक्रिया सुरू, अर्ज करा!
MPSC Krushi Bharti
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेत (२०२४) कृषी सेवेतील (MPSC Krushi Bharti) पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवेतील २५८ पदे ही त्यात समाविष्ट झाली असून, १ डिसेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी कृषी सेवेतील पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थीनी केली होती. त्यासाठी पुण्यात आंदोलनही करण्यात आले होते. यामुळे राज्य शासनाने नियोजितपरीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या बैठकीत या २५८ पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- पदाचे नाव – उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर
- पदसंख्या – 258 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 सप्टेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2024
How To Apply For MPSC Krushi Seva Application 2024
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. तसेच, अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा, अर्ज 27 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील. आणि हो, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
12 th pass student can apply
Vjbhhg