MPESB ग्रुप ५ अंतर्गत ११७० पदांची मोठी पदभरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा!
MPESB Opening Jobs Recruitment
मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने (MPESB Recruitment 2025 Details) ग्रुप-5 अंतर्गत नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत MPESBच्या अधिकृत संकेतस्थळावर MPESB Opening Jobs Recruitment – esb.mp.gov.in जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. या भरतीसाठी परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाईल. परीक्षा दोन सत्रांमध्ये होईल, ज्यामध्ये पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 11 दरम्यान, तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 5 दरम्यान असेल. उमेदवारांना त्यांच्या शिफ्टनुसार परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे आवश्यक आहे, जिथे पहिल्या शिफ्टसाठी उमेदवारांना सकाळी 7 ते 8 दरम्यान आणि दुसऱ्या शिफ्टसाठी दुपारी 1 ते 2 दरम्यान हजेरी लावावी लागेल.
MPESB Recruitment & Jobs 2025 Opening – प्रारंभी ही भरती 881 पदांसाठी होणार होती, मात्र आता पदसंख्या वाढवून 1170 करण्यात आली आहे. यात नर्सिंग ऑफिसर, स्टाफ नर्स आणि मेल नर्ससाठी 82 पदे, फार्मासिस्ट ग्रेड-2 साठी 29 पदे, लॅब टेक्निशियन आणि संबंधित पदांसाठी 634 पदे, रेडिओग्राफर आणि डार्क रूम असिस्टंटसाठी 127 पदे, OT टेक्निशियनसाठी 9 पदे, ऑप्टोमेट्रिस्टसाठी 11 पदे, आणि डेंटल हायजिनिस्ट, डेंटल मेकॅनिक आणि डेंटल टेक्निशियनसाठी 14 पदे आहेत. याशिवाय प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, रेडिओथेरपी टेक्निशियन, अॅनेस्थेशिया आणि व्हेंटिलेटर टेक्निशियन, EEG टेक्निशियन, CSSD टेक्निशियन, लॅब अटेंडंट, OPD अटेंडंट, डायलिसिस अटेंडंट, TB आणि चेस्ट डिसीज हेल्थ व्हिजिटर, अॅलर्जी टेक्निशियन, PFT टेक्निशियन, रेस्पिरेटरी थेरपिस्ट, ECG टेक्निशियन, कॅथलॅब टेक्निशियन आणि डायलिसिस टेक्निशियन यांसाठीही विविध पदे भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, अशी सूचना आहे. ही भरती प्रक्रिया नर्सिंग, पॅरामेडिकल आणि तांत्रिक तसेच सहाय्यक पदांवरील निवडीसाठी आयोजित केली जात आहे. पात्र उमेदवार 30 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू करू शकतात.