महत्वाचा अपडेट! दोन पेक्षा अधिक मुले असलेले कारकून भरतीच्या नोकरीस अपात्र!
more than 2 kids no government job
खंडपीठाकडून सरकारी नोकरीच्या भरती अपडेट संदर्भात एक महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. जर, तुम्हाला दोन पेक्षा अधिक मुले आहेत तर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नोकरभरतीसाठी अपात्र आहात. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून कारकून पदांसाठी सुरू असलेल्या भरतीसाठी ही अट घालण्यात आली आहे. मग तुमची शैक्षणिक पात्रता कितीही असली तरीही या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत! (more than 2 kids no government job)
उच्च न्यायालयात कारकुनाची १७ पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीत ज्या विविध अटी घालण्यात आल्या आहेत, त्यात उमेदवाराला दोनपेक्षा अधिक मुले असता कामा नये असे म्हटले आहे, अशा प्रकारची ही अट राज्यात नोकरभरतीसाठी पहिल्यांदाच घालण्यात आली आहे. प्रसुतीच्यावेळी एकावेळी एक पेक्षा अधिक मुले जन्माला आली तर मात्र ती एकच असे धरले जाणार आहे. ही सवलत मार्च २००५ पर्यंत जन्मलेल्या मुलांच्या बाबतीतच दिली जाणार आहे. त्यानंतर जन्मलेल्यांसाठी ही सवलत दिली आणार नाही.
१६ जानेवारी २०२५ ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. १८ ते ४५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. एससी/एसटीसाठी ५० पर्यंत वयोमर्यादित शिथिलता देण्यात आली आहे. उमेदवार पदवीधर हवा. त्याला टंकलेखनाचे ज्ञान हवे आणि टंकलेखनाची गती किमान ४० शब्द प्रतिमिनीट हवी. कोकणी भाषेचे ज्ञान सक्तीचे आहे तर मराठी भाषेचे ज्ञान अतिरिक्त गुणवत्ता ठरणार आहे. लेखी व तोंडी परीक्षेतील गुणांच्या आधारावर उमेदवार निवडण्यात येणार आहेत.