नवीन बातमी !!लाडक्या बहिणीची संख्या वाढली , हप्ता कधी मिळणार ?-More Beneficiaries, But Where’s the Payment?

More Beneficiaries, But Where’s the Payment?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थींची संख्या कमी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असताना, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आकडेवारीसह हा दावा फेटाळला. त्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये २ कोटी ३३ लाख लाभार्थींना निधी दिला गेला होता, तर जानेवारी २०२५ मध्ये हा आकडा २ कोटी ४७ लाखांपर्यंत पोहोचला, म्हणजेच तब्बल १३ लाखांची वाढ झाली आहे.

More Beneficiaries, But Where’s the Payment?

विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २,१०० रुपये करण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप केला आणि विधानसभेतून वॉकआउट केले. त्यावर मंत्री तटकरे यांनी, “निधी वाढीचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. कोणत्याही लाभार्थ्यांची फसवणूक होणार नाही,” असे आश्वासन दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबतही सरकारला प्रश्न विचारले. मंत्री तटकरे यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, यासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

दरम्यान, विरोधकांनी आकडेवारी आणि स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचा आरोप करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.

Leave A Reply

Your email address will not be published.