मेटा एआयची टक्कर!-Meta AI vs ChatGPT!
Meta AI vs ChatGPT!
आता एआयच्या दुनियेत स्वतःचं वेगळं स्थान बनवायचं ठरवून, मेटा प्लॅटफॉर्मनं आपला खास ‘मेटा एआय’ अॅप बाजारात आणलाय. ओपन एआयनं तयार केलेल्या चॅटजीपीटीला टक्कर द्यायला मेटानं हा अॅप बनवलाय.
या अॅपमध्ये सोशल मीडियासारख्या अनेक झकास फिचर्स मिळणार आहेत. ‘लामा ४’ नावाच्या एआय टेक्नॉलॉजीवर हा अॅप तयार केलाय. या अॅपमध्ये ‘डिस्कव्हर फीड’ नावाची खास फीचर आहे, ज्यातून लोक एआयसोबत कसं गप्पा मारतात ते समजून घेता येतं. शिवाय, ‘व्हॉइस मोड’मुळं तुम्ही आवाजात एआइसोबत बोलू शकता.
‘मेटा एआय’मधून मेटा सोशल मीडियाच्या तर्जावर अनुभव देतोय आणि यामुळं ह्या अॅपला वेगळी ओळख मिळतेय. हा अॅप मोफत आणि ओपन सोर्स म्हणून दिला गेलाय, हे मेटाचं इतर स्पर्धकांपेक्षा वेगळं पाऊल आहे.
‘लामा-कॉन’मध्ये एआयवर चर्चा!
मेनलो पार्क (कॅलिफोर्निया) इथं मेटानं ‘लामा-कॉन’ परिषद घेतली, जिथं झुकेरबर्ग आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नाडेला यांनी एआयच्या प्रचंड वेगानं होणाऱ्या प्रगतीवर चर्चा केली.
झुकेरबर्ग म्हणाले, “एआयमुळं उत्पादनक्षमता वाढेल, पण त्याचा परिणाम जीडीपीवर लगेच दिसणार नाही. काही वर्षं लागतील.”
नाडेला म्हणाले, “एआय म्हणजे विजेसारखी शक्ती आहे, पण तिचा उपयोग बदल घडवण्यासाठी योग्य सॉफ्टवेअर व सिस्टिम लागतात. लोकांनी एआयसोबत काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे.”
‘मेटा एआय’ची ठळक वैशिष्ट्यं:
- फेसबुक, इंस्टाग्रामशी थेट लिंक
- बोलीभाषेत संवाद
- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सुरुवात
- व्हॉइस कमांडचा वापर
- वापरकर्त्यांशी थेट संवाद