‘माझी टीएमटी’ अँपची ठाणेकरांना प्रतीक्षा – Mazi TMT App Download

Mazi TMT App Download

ठाणे पालिकेच्या परिवहन विभागाची (टीएमटी) बस नेमकी कुठे आहे, याची तंतोतंत माहिती प्रवाशांना मिळावी आणि मार्गावरील प्रवासाचे नेमके भाडे देता यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘माझी टीएमटी’ ‘अॅप’चे (Mazi TMT App Download)  नुकतेच लोकार्पण करण्यात आले. सुरुवातीला ‘टीएमटी’ च्या काही बस मार्गावर ते सुरूही करण्यात आले. मात्र, सध्या ‘अॅप’ची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे निदर्शनास आले आहे. बसवाहक-चालक यांना ‘अॅप’चा वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे ही सेवा सुरू होण्यास अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाईल, अशी माहिती ‘टीएमटी’च्या सूत्रांनी दिली. शहरातील विविध भागांत ‘टीएमटी’ च्या बसमधील प्रवाशांची संख्या मोठी असून प्रवाशांना तिकिटासाठी सुट्या पैशांची जमवाजमव करावी लागते. कधी कधी त्यावरून वाहक व प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमकी झडतात. यावर पर्याय म्हणून ‘डिजिटल’ तिकीट सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. मात्र, सेवा मिळत नसल्याने प्रवासी नाराज आहेत.

Mazi TMT App

या अँप मध्ये सुविधा काय ?

• अॅपद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकीट काढता येईल. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा वापर करून पैसे भरता येतील. माझी TMT • प्रवाशांना बस कुठे आणि किती वेळेत थांब्यावर येईल, याची माहिती देण्याची सुविधाही या अॅपमध्ये असेल. प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्यस्थान यांची माहिती भरून बसमार्ग, त्या मार्गावरील उपलब्ध बस, त्यासाठी लागणारे तिकीट भाडे याचीही माहिती मिळेल.

 

या संदर्भात ठाणे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘अॅप’वर नोंदणी करताना प्रवाशांना ज्या तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दिली. परंतु हे ‘अॅप’ सध्या कोणत्या मार्गावर सुरू करण्यात आले आहे, याची विचारणा केली असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. येत्या काही दिवसात हे ‘अॅप’ सर्व मार्गावर सुरू होईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.

डाउनलोड करा 

Leave A Reply

Your email address will not be published.