अंगणवाडी पदभरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद! – Massive Response for Anganwadi Recruitment!
Massive Response for Anganwadi Recruitment!
जिल्ह्यात १०८ अंगणवाडी सेविका आणि २०० मदतनीस पदांच्या भरती प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण २,४८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही संख्या रिक्त पदांपेक्षा आठपट जास्त आहे. विशेषतः अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि माळशिरस या तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत.
उच्चशिक्षित महिलांचाही अर्जदारांत समावेश
सेविका पदासाठी बारावी व मदतनीस पदासाठी दहावी शिक्षण आवश्यक असले तरी पदवीधर व डीएड केलेल्या महिलांनीही अर्ज दाखल केले आहेत. तसेच, विधवा आणि परितक्त्या महिलांनीही मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत.
भरती प्रक्रिया आणि पुढील टप्पे
- अर्जांची छाननी व कागदपत्र पडताळणी सुरू
- प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार
- हरकती व आक्षेप नोंदविण्याची संधी
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार
सेवानिवृत्ती नंतरची आर्थिक असुरक्षा – वाढीव अनुदानाची मागणी
- अंगणवाडी सेविकांना दरमहा १२ ते १५ हजार रुपये, तर मदतनीस महिलांना १० हजारांपर्यंत मानधन मिळते.
- मात्र, सेवानिवृत्तीनंतर सेविकांना केवळ १ लाख रुपये, तर मदतनीस महिलांना फक्त ७५ हजार रुपये अनुदान मिळते.
- ही रक्कम वाढवावी, अशी मागणी होत असून शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिकृत माहिती आणि सूचनांसाठी उमेदवारांनी महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.