खुशखबर ;महाराष्ट्र महसूल विभागात मोठी भरती,अर्ज प्रक्रिया सुरू!!
Massive Recruitment in Maharashtra Revenue Department!!
महाराष्ट्र राज्य महसूल विभागात विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
राज्यातील प्रमुख खंडपीठ बृहन्मुंबई तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील इतर खंडपीठांसाठी अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) पदांसाठी ही भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली असून, उमेदवारांना अधिकृत ईमेल jla.revenue@maharashtra.gov.in वर अर्ज सादर करावा लागेल.
पदांचा तपशील:
बृहन्मुंबई खंडपीठ: अध्यक्ष (संभाव्य रिक्त), सदस्य (न्यायिक व प्रशासकीय)
पुणे खंडपीठ: सदस्य (न्यायिक व प्रशासकीय)
छत्रपती संभाजीनगर खंडपीठ: सदस्य (न्यायिक व प्रशासकीय)
नागपूर खंडपीठ: सदस्य (न्यायिक व प्रशासकीय)
निवड प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, २०२५ नुसार केली जाणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा शासन नियमांनुसार निश्चित केली जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑफलाइन किंवा ईमेलद्वारे सादर करावा. अर्ज बंद लिफाफ्यात पाठवावा आणि लिफाफ्यावर “महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण, अध्यक्ष / सदस्य न्यायिक / सदस्य प्रशासकीय पदासाठी अर्ज” असे स्पष्टपणे नमूद करावे. अर्ज सादर करण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे:
उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२