१०वी, १२वी पास उमेदवारांना सरळ नोकरीची संधी; महिला व बालविकास विभागात भरती सुरु!
Mahila Bal Vikas Vibhga Bharti New Jobs
सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागात सध्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे (Mahila Bal Vikas Vibhga Bharti New Jobs) . महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे येथे या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.
महाराष्ट्र राज्यातील महिला व बालविकास विभागाची स्थापना महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आली आहे. या विभागाचे उद्दिष्ट महिलांचे सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण, आणि सर्वांगीण विकास घडविणे हे आहे. महिला व बालविकास विभाग विविध योजना, सेवा, आणि उपक्रमांच्या माध्यमातून महिला व बालकांसाठी त्वरित मदत आणि दीर्घकालीन विकास साध्य करण्याचे कार्य करते. या विभागात १० वी १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे.
महिला व बालविकास विभागात २३६ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरु झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२४ आहे. या भरतीमध्ये संरक्षण अधिकारी ग्रुप बी, परिवीक्षा अधिकारी ग्रुप सी, लघुलेखक, ज्युनियर लघुलेखक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ काळजीवाहक, आणि स्वयंपाकी ग्रुप डी अशा विविध पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने किमान १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा. अर्जासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे. या नोकरीचे स्थान पुणे येथे असेल. त्यामुळे, महाराष्ट्र शासनाच्या या विभागात नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
Mahila Bal Vikas Vibhga Bharti Education Criteria
- परीक्षेचे शुल्क
- १ खुला प्रवर्ग रु.१०००/-
- मागासवर्गीय प्रवर्ग रु.९००/- (१०% सुट) परीक्षा शुल्क ना -परतावा (Non-Refundable) आहे.
form kuthe bharaycha
10 fail job
कागद पत्र काय लागतील
सर मला इंग्लिश कमी येते माझा साठी जॉब मिळेल का?
Thank you
Where are job location
Apply kuthe ani ks kraych
Job nashik district madhe asel ka??
Time ky asel
Job details
Please update this type of government jobs opportunity on the basis of 12 th .
Post kanti