ऐतिहासिक पाऊल !! Mahadiscom ही कंपनी लवकरच शेअर बाजारात!
MahaVitaran Goes Public!
राज्यातील ‘महावितरण’ (महाडिस्कॉम) कंपनी लवकरच शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. राज्य सरकारची शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ही पहिलीच कंपनी असेल.
पुढील दोन वर्षांत (मार्च २०२७) ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कंपनीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि ग्राहकांसाठी विजेचे दर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे.
आर्थिक स्थैर्यासाठी ठोस पावले
महावितरणने ‘रिसोर्स अॅडिक्वेसी प्लॅन’ तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य ऊर्जा संक्रमण योजना राबवणारे पहिले राज्य ठरले आहे. गेल्या दोन वर्षांत ४५,००० मेगावॉट वीज खरेदी करार निश्चित करण्यात आले आहेत.
ऊर्जेची वाढती मागणी
२०३० पर्यंत महाराष्ट्राची ऊर्जा मागणी १,८५,००० दशलक्ष युनिटवरून २,८०,००० दशलक्ष युनिटपर्यंत वाढेल. त्यानुसार राज्याचा ऊर्जा वापर स्पेन, इटली, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियापेक्षाही जास्त असेल.
नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वाटा
पुढील पाच वर्षांत नवीकरणीय ऊर्जेचा वाटा १३% वरून ५२% पर्यंत वाढेल. तसेच, राज्याची वीजनिर्मिती क्षमता २०३० पर्यंत ८१,००० मेगावॉटपर्यंत पोहोचेल. योग्य खर्च नियोजनाद्वारे पुढील पाच वर्षांत १,१३,००० कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट आहे.