महापारेषणमध्ये भरती! पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी!! | MAHATRANSCO Recruitment! 260 Vacancies!
MAHATRANSCO Recruitment! 260 Vacancies!
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 260 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.mahatransco.in/career/active या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2025 आहे.
ही भरती अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी या परिमंडळ कार्यालयांसाठी करण्यात येत आहे. यामध्ये निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) या पदांसाठी उमेदवारांकडे बी.कॉम. पदवी आणि एमएस-सीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असावे. तसेच, मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे राहील, तर माजी सैनिकांसाठी सैनिकी सेवेसह तीन वर्षांची सवलत दिली जाणार आहे.
निवड प्रक्रियेसाठी 150 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात द्यावी लागेल. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी ₹600 आणि अनुसूचित जातीसाठी ₹300 परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे.
भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी http://www.mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी ही संधी गमावू नये!