महाराष्ट्र सरकारचा मीडिया मॉनिटरिंग निर्णय!-Maharashtra Govt’s Media Monitoring Move!
Maharashtra Govt's Media Monitoring Move!
महाराष्ट्र सरकारने मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसंदर्भातील सकारात्मक आणि नकारात्मक बातम्यांवर नजर ठेवणे, तसेच बनावट बातम्यांवर कारवाई करणे, हा या सेलचा प्रमुख उद्देश असेल. या उपक्रमासाठी १० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR) याच्या प्रस्तावानुसार, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आणि डिजिटल माध्यमांमधील बातम्यांचे विश्लेषण आणि अचूक वृत्तांकन करण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. डॅशबोर्ड आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती संकलन आणि प्रसारण केले जाईल.
ही एजन्सी सुरुवातीला एका वर्षासाठी नियुक्त केली जाईल, आणि काम समाधानकारक राहिल्यास तिचा करार दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. हा सेल सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत कार्यरत असेल आणि DGIPR द्वारे व्यवस्थापित केला जाईल. ई-निविदा प्रक्रियेद्वारे एक व्यावसायिक सल्लागार नेमला जाणार असून, तो विविध माध्यमांवर नजर ठेवून राज्य सरकारसंबंधी बातम्यांचे विश्लेषण करेल. तसेच, पत्रकारांच्या ट्रेंड आणि वृत्तवाहिन्यांच्या दृष्टिकोनाचा मागोवा घेतला जाईल.