महापारेषण परीक्षा पुढे ढकलली!-Mahapareshan Exam Postponed!
Mahapareshan Exam Postponed!
राज्य सरकारच्या महापारेषण विभागामार्फत होणारी महाजनको भरती परीक्षा आता पुढं ढकलण्यात आलीये! ६ जुलैपासून सुरू होणारं हे परीक्षा आयोजन अचानक थांबवलं गेलं. अजून तरी सुधारित तारीख जाहीर झाली नाही, त्यामुळे उमेदवारांचा संभ्रम वाढलाय.
डिसेंबर २०२४ मध्ये ही भरती जाहीर झाली होती आणि असिस्टंट इंजिनीअर व लोअर डिव्हिजन क्लर्क पदांसाठी ही परीक्षा होती. सगळ्या महाराष्ट्रातून तब्बल ३० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता.
उमेदवारांचा मुद्दा असा की, परीक्षा मराठीत होणार की इंग्रजीत यावर कुठलीही अधिकृत माहिती दिलेलीच नाही! त्यामुळे मराठीसह इंग्रजी भाषेत परीक्षा घ्या, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केलीये.
वरून टीसीएस आयओएन सारख्या प्रामाणिक केंद्रांवर परीक्षा घ्यावी, अशीही मागणी आहे. पण अजून महापारेषणकडून यावर काहीच स्पष्टीकरण नाही. एकंदरीत, परीक्षा कधी होणार याची वाट पाहावी लागणारच!
ठळक मुद्दे:
-
महापारेषण भरती परीक्षा पुढे ढकलली
-
३०,०००+ उमेदवारांची प्रतीक्षा
-
सुधारित तारीख अद्याप जाहीर नाही
-
मराठी भाषेतील परीक्षेची मागणी
-
TCS iON केंद्रांवर परीक्षा घेण्याची शिफारस