खुशखबर! महाजेनकोची ८०० पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित, १० वी पास उमेदवारांना…!
MahaGenco 800 Posts Bharti
मित्रांनो, महानिर्मिती (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड – Mahagenco) द्वारे आज २६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. हि जाहिरात तब्ब्ल 800 तंत्रज्ञ-3 पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तांत्रिक कौशल्य असलेल्या म्हणजेच ITI पास उमेदवारांना एक उत्कृष्ट नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन स्वरूपात असून इच्छुक उमेदवार [महानिर्मितीच्या अधिकृत संकेतस्थळावर – https://www.mahagenco.in) जाऊन अर्ज करू शकतात. ITI प्रमाणपत्र असलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरतात. मित्रानो लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे.
भरतीच्या संदर्भात पात्रताधारकांनी वयोमर्यादेची अट (18-38 वर्षे) पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज शुल्क ₹500 (खुला प्रवर्ग) आणि ₹300 (मागास प्रवर्ग) इतकी आहे. उमेदवारांची निवड लिखित परीक्षा व कौशल्य चाचणीद्वारे केली जाणार आहे. याशिवाय, भरती प्रक्रियेची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे इच्छुकांनी अर्ज लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
महानिर्मितीमध्ये नोकरी मिळणे म्हणजे सरकारी क्षेत्रात स्थिरता, चांगले वेतन आणि करिअर वृद्धीच्या संधी मिळविण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता, वयोमर्यादा व पात्रता तपासून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीची PDF डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Kontay thikani ahe jaga
Ravi solanki