एलएलबी CET निकाल जाहीर !
LLB CET Result Soon!
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं (CET Cell) एमएच-एलएलबी ५ वर्षांचं CET २०२५ संदर्भात एक महत्वाची नोटीस काढली आहे जी त्यांच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर उपलब्ध आहे. निकाल जाहीर होण्याआधीच उमेदवारांना SMS आणि ई-मेल वरून माहिती कळवण्यात येणार आहे.
ही परीक्षा २८ एप्रिल २०२५ रोजी दोन सत्रांत पार पडली होती. परीक्षेतील आक्षेप निवारणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. CET Cell ला एकूण ३५२ आक्षेप प्राप्त झाले. त्यातील ४७ अद्वितीय आक्षेप ID होते. काही आक्षेप मान्य करून त्यावर तोडगा काढण्यात आलाय.
उदाहरणार्थ:
-
इंग्रजी विभागात ८६ आक्षेप आले, त्यात २ मान्य झाले.
-
लॉजिकल आणि अॅनालिटिकलमध्ये सर्वात जास्त – १८३ आक्षेप आले, त्यात ४ मंजूर झाले.
-
काही विषयात मात्र एकही आक्षेप मंजूर झालेला नाही.
एकूण ६ प्रश्नांच्या उत्तर की मध्ये बदल करण्यात आले आहेत. काही प्रश्नांना थेट पूर्ण गुण देण्यात आले आहेत.
निकालाची प्रोसेस आता सुरु झाली असून लवकरच उमेदवारांना त्यांचा स्कोअरकार्ड पर्सेंटाइलसह उपलब्ध करून दिला जाणार आहे. CET Cell कडून यानंतर आक्षेपाबद्दल कुठलीही विचारणा केली जाणार नाही.