लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ! ‘ सुरूच राहणार ‘ – Ladki Bahin Yojana’ Will Continue!
Ladki Bahin Yojana Will Continue!
राज्यात सुरू असलेल्या कल्याणकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर काहीसा ताण असला तरी आर्थिक शिस्त पाळण्यात आली आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सोमवारी सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत त्यांनी ही ग्वाही दिली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना थांबवलेल्या नाहीत किंवा चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. माझ्यात आणि शिंदे साहेबांमध्ये कोणतेही शीतयुद्ध नाही.”
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. पहिल्याच दिवशी २०२४-२५च्या पुरवणी मागण्या सादर होणार असल्याने, सत्ताधारी आणि विरोधक यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असेल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सरकारी चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला.