सर्वात मोठी बातमी जाणून घ्या !! लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana When Will 2100 Be Given?

राज्य सरकारने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाले असले तरी याबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांना वाढीव रक्कम कधीपासून मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana When Will 2100 Be Given?

2100 रुपये मिळण्याबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण
अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेबाबत मोठी घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यावर कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नव्हते. अखेर अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, “आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ. सध्या आमची परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल. पैशांचे सोंग करता येत नाही.”

महत्त्वाच्या निर्णयांबाबत अपडेट

  • शेतकरी कर्जमाफी: याबाबत माहिती संकलन सुरू
  • ऑनलाईन लॉटरी समिती: सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार
  • धान उत्पादक शेतकरी मदत: प्रती हेक्टर २०,००० रुपये मदतीचा निर्णय अंतिम

महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे सरकार कधी याबाबत ठोस निर्णय जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.