New Update !! लाडकी बहिण योजना पडताळणी थांबली ! वाचा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana: Verification Paused!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. मात्र, काही अपात्र महिला देखील लाभ घेत असल्याचे आढळल्याने अर्जांची छाननी सुरू करण्यात आली.
पडताळणीला ब्रेक का लागला?
राज्य सरकारने लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे असा नियम ठरवला आहे. पण अनेक महिलांनी चुकीची माहिती दिल्याने सरकारने अर्जांची तपासणी सुरू केली. यासाठी सरकारने आयकर विभागाकडे उत्पन्नाचा डेटा मागितला, मात्र आयकर विभागाने सहकार्य नाकारले, त्यामुळे पडताळणी प्रक्रिया रखडली आहे.
महत्वाचे अपडेट्स:
- सरकार लवकरच आयकर विभागाकडून आवश्यक माहिती मिळवणार आहे.
- उत्पन्न तपासणीनंतर अपात्र महिलांची नावे यादीतून वगळली जातील.
- 6 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ थांबतो.
- लग्नानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना या योजनेचा फायदा होत असून, सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.