खुशखबर !! लाडकी बहीण योजना सुरूच राहणार ; बंद होणार नाही !-Ladki Bahin Yojana Continues!
Ladki Bahin Yojana Continues!
काल झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, विरोधक कितीही आरोप केले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. डोंबिवलीतल्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आयोजित स्वच्छता प्रकल्पाचं उद्घाटन आणि विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी माहिती दिली की, शहराच्या सात प्रभागांमधील कचरा “सुमित एन्को ग्रुप” मार्फत उचलला जाणार आहे. ह्या स्वच्छतेचं काम चेन्नई पॅटर्न प्रमाणे राबवण्यात येणार आहे. ठेकेदाराला सात प्रभाग टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केले जातील आणि त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार मोबदला दिला जाणार आहे.
व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती:
-
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
-
भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण
-
आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाड
-
पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठेकेदारांना सूचना दिल्या की, यापूर्वी जे कामगार काम करत होते त्यांनाही या नव्या योजनेत सामील करून घ्यावं. यासोबतच, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमधला कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाणार, असंही त्यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ:
-
टाटा कौशल्यविकास प्रकल्पाचे भूमिपूजन
-
टिटवाळ्यात उद्यानाचे लोकार्पण
-
प्रकल्प बाधितांना घरांचे वाटप
-
परिवहन कर्मचारी पेन्शन योजना पत्र वाटप
-
दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांना दुचाकी वितरण
आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की, शहर स्वच्छतेसाठी नव्या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. शहराचं मॉडेल इंदूरसारखं स्वच्छ बनवायचं, यासाठी काटेकोरपणे नियमांचं पालन होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.