लाडकी बहीण आता पतसंस्था मालक!-Ladki Bahin Starts Her Own Bank!

Ladki Bahin Starts Her Own Bank!

आता आपल्या लाडक्या बहिणींचं खरं आर्थिक स्वावलंबन सुरू होणार हाय! सांगली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत असलेल्या ७ लाख ५२ हजार महिलांना केंद्रस्थानी ठेवून सहकारी पतसंस्था उभारण्याची तयारी सुरू झालीये. हे सगळं काम रक्षाबंधनापूर्वी पूर्ण करायचंय!

Ladki Bahin Starts Her Own Bank!महिलांना दरमहिन्याला मिळणाऱ्या ₹१५०० च्या रकमेचा आर्थिक उपयोग वाढवून त्या महिलांना स्वतःची पतसंस्था चालवता यावी यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सहकार विभागानं पुढाकार घेतलाय. जिल्ह्यातून जमा होणारी एक कोटीहून अधिक उलाढाल आता महिलांच्या सहकार चळवळीत बदलणार आहे.

नोंदणीसाठी काय लागणार?
महापालिकेत – २००० महिला, ₹३० लाख भागभांडवल
तालुक्यात – ५०० महिला, ₹५ लाख
गावात – २५० महिला, ₹१.५ लाख

प्रवर्तकाचं पोलिस व्हेरिफिकेशन, सावकारीपासून दूर असणं, वचनपत्र, इत्यादी अटी पाळूनच संस्था नोंदवली जाणार. प्रत्येक तालुक्यातल्या महिलांची यादी तयार करून, नोंदणी प्रक्रियेला वेग देण्यात आलाय.

सुनील चव्हाण, सांगली उपनिबंधक म्हणाले —
“लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची खास भेट म्हणून पतसंस्था सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे!”

ठळक मुद्दे:

  • सांगली जिल्ह्यात ७.५२ लाख लाभार्थी महिला

  • दरमहा ₹१५०० अनुदानातून पतसंस्था स्थापनेस चालना

  • महिलांसाठी स्वावलंबनाची नवी दिशा

  • रक्षाबंधनपूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचा प्रयत्न

Leave A Reply

Your email address will not be published.