महत्वाचे! – लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा नवा निर्णय; बँकांना देणार नवीन महत्वाच्या सूचना!

Ladki Bahin New Bank Instructions


सध्या लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांना सरकार तर्फे ३,०००रु खात्यात जमा करण्यात येत आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) अनेक महिलांच्या खात्यावरील जमा झालेले पैसे बँकांकडून कट करण्यात आल्याच्या तक्रारी समोर येताच महायुती सरकारने लवकरच बँकांसोबत बैठक करुन त्यातून मार्ग काढण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी बँकांसोबत पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील संबंधितांनी दिली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संबंधी बँकासोबत पत्र व्यवहार केला आहे, तसेच बँकांसोबत बैठकीचे आयोजन करुनही त्यांना सूचना केल्या जातील अशी माहिती समोर येत आहे. असं झाल्यास महिलांना मिळालेला हा सर्वात मोठा दिलासा असेल. हा अपडेट महिलांसाठी नक्कीच दिलासा दायक आहे 

Ladki Bahin Important Update Banking

दरम्यान, आता इथून पुढे फक्त अंगणवाडी सेविकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यापूर्वी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन, ग्रामसेवक, आपले सेवा सरकार अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना प्राधिकृत करण्यात आले होते. सरकारकडून त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये दिले जात होते. पण, आता केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील. राज्य सरकारने याबाबत शासन आदेश जारी केला आहे.



2 Comments
  1. Sunaina sharma says

    Maza form bharla Gela Aahe pan Account madhe paise nahi Aale September 2 takhila dila hota form

  2. Renuka says

    form aug-2024 madhe bharla gela ahe Maze pan paise ajun jama zale nahi.

Leave A Reply

Your email address will not be published.