2100 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात या दिवशी जमा होणार, मुख्यमंत्री शिंदेनी केली तारीख जाहीर
Ladki Bahin Latest payment date
सध्या महाराष्ट्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत.सोबतच घोषणांचा पाऊस जोरदार सूरू आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार महिलांना 1500 रुपये प्रति महिना देत आहे. या योजनेतून आतापर्यंत 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना पाच हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे.
यातच महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की, आता महिलांना दरमहा 1500 रुपयां ऐवजी 2100 रुपये दिले जातील. तथापि, 2100 रुपयांचा हप्ता महिलांना कधी मिळणार (Ladki Bahin Yojana 6th Installment Date) याबद्दल अधिक माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत.
सध्या सोशल मीडियावर महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. आमच्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या एकत्रित 3000 रुपयांची रक्कम 15 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात जमा केली आहे. त्यामुळे महिलांना यापुढे कुठलाही अतिरिक्त दिवाळी बोनस मिळणार नाही, कारण शासनाने यासंबंधी कोणताही नवीन जीआर काढलेला नाही.
यावेळी, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेच्या सहाव्या हप्त्याची माहिती मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, “आमच्या सरकारने स्थापन झाल्यानंतर, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता जमा होईल.”