आनंदाची बातमी ‘लाडकी बहीण’च्या हफ्त्याची तारीख अखेर निश्चित! जाणून घ्या किती मिळणार..
Ladki Bahin Jan 2025 Payment Date
Ladki Bahin Jan 2025 Payment Date : लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींमध्ये एकच प्रश्न होता – “जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?” यावर विविध तर्कवितर्क लावले जात होते. परंतु अखेर, या संदर्भात एक अधिकृत अपडेट समोर आली आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी वितरित केला जाणार आहे. या हप्त्यासाठी ३,६९० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
विरोधकांनी राज्याच्या तिजोरीत निधी नाही, असा आरोप केला असला तरी महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, आवश्यक निधी पुरेसा आहे आणि तो उपलब्ध करण्यात आलेला आहे.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जानेवारी महिन्यातील आवश्यक निधी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.”
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जातात. डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच वितरित करण्यात आलेला आहे, आणि महिलांच्या अपेक्षेनुसार जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
या योजनेचे महत्त्व लक्षात घेत, आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात.”
तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने योजनेच्या लाभार्थींना कोणत्याही अडचणींशिवाय हा हप्ता मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. “तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी तहसील प्रशासन सतत कार्यरत आहे,” असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
August 24 mdhe approval ala asun mla ajun ek hi hafta ala nhi…..adhar link seeding pn ahe Sagal proper ahe mg ka nhi ale ajun paise