लाडकी बहीण योजनेत झाला फ्रॉड! समोर आली धक्कादायक घटना! ; पतीने लावला सरकारला ४०,००० हजाराचा चुना!

ladki bahin fraud


प्राप्त माहिती नुसार, राज्यभरात महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असताना या योजनेत गैरकारभार होत असल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी दि.2 रोजी पनवेलचे तहसीलदार यांना लिहलेल्या पत्रात केली आहे. खारघर शहरातील महिला पुजा प्रसाद महामुनी यांचा या योजने अंतर्गत अर्ज भरत असताना त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून साताऱ्यामधील जाधव नामक तिर्हाईत व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे या योजनेचा लाभ घेतला असल्याचे सामोर आले आहे महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे खारघर मधील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या जनसंपर्क कार्यालयात याबाबत तक्रार केली. बाविस्कर यांनी याबाबत तपासणी केली असता महामुनी यांच्या नावाने अर्ज अप्रूव्हड झाले असल्याचे त्यांना ऑनलाईन दिसून आले. त्याठिकाणी मोबाईल नंबर मात्र सातारच्या जाधव नामक व्यक्तीचा असल्याचे दिसून आले. याबाबत अधिक माहिति मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले. बाविस्कर यांनी याबाबत त्वरित पनवेल तहसील कार्यालय गाठले आणि झालेल्या प्रकाराबाबत नायब तहसीलदार संजय भालेराव यांना माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यासोबत किरण पाटील,स्वतः तक्रारदार महिला पूजा महामुनी ,कंचंन कुमार बिरला आदी उपस्थित होत्या.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने 30 महिलांच्या आधार कार्डचा वापर करुन या योजनेसाठी 30 वेगवेगळी अर्ज केले. या 30 पैकी 26 अर्जाचे खाते तर एकाच बँकेत निघाले. हे खाते एका सहकारी बँकेचे असल्याचे समोर आले आहे. या पठ्ठ्याने हा महाघोटाळा करत लाडकी बहीण योजनेलाच चुना लावला. या खात्यात ही रक्कम जमा झाली.  याप्रकरणात पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या आरोपीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी या पनवेलमधील महिलाचा फोटो वापरला. महिलेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

महिलांच्या वेशात फोटो

या योजनेचा लाभ घेण्यासाठी या आरोपीने अगोदर महिलांचे वेगवेगळे कपडे घातले. पंजाबी सूट, पोलकं, साडी, विविध केश रचना करत त्याने स्वतःचेच अनेक फोटो काढले. असे त्याने 27 फोटो काढले. स्वतःची 27 रुपात त्याने फोटो काढले. या प्रत्येक फोटोला, छायाचित्राला त्याने वेगवेगळ्या महिलांचे आधार कार्ड जोडले. विशेष म्हणजे त्याचे सर्व अर्ज मंजूर झाले. त्याच्या सहकारी बँकेतील खात्यात योजनेची रक्कम सुद्धा जमा झाल्याची माहिती एनबीटीने दिली आहे.

असा झाला भांडाफोड

खारघर येथील पूजा महामुनी (27) यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली. पण प्रत्येकवेळी त्यांचा अर्ज नामंजूर होत होता. दरम्यान 15 ऑगस्टनंतर अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. प्रशासनाने महामुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी अर्जच नामंजूर झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रशासनाने चौकशी केली. आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक शोधून काढला.

पूजाने एनबीटीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा अर्ज नामंजूर झाला. त्यामुळे त्यांनी पनवेल शहरतील नगरसेवकाची मदत घेतली. 29 ऑगस्ट रोजी त्यांनी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकावरुन अर्ज सादर केला. त्यावेळी तुमचा अर्ज अगोदरच मिळाला आहे आणि तो मंजूर झाल्याचा सिस्टिम जनरेटेड मॅसेज आला. तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

30 लाभार्थी एकाच क्रमांकावर

पनवेल तहसील कार्यालयाने याप्रकरणात सावधगिरीने पाऊल टाकले. त्यांनी आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक शोधला. त्यावर कॉल केला. त्यात योजनेसंबंधीची माहिती सांगत, एका प्रक्रियेसाठी ओटीपी मागितला. त्यावेळी सिस्टममध्ये 30 लाभार्थ्यांसाठी एकच मोबाईल क्रमांक वापरल्याचे समोर आले. त्यानंतर तहसील कार्यालयाने संबंधिताविरोधात तक्रार करत कारवाईची विनंती केली आहे.

योजनेचे पेमेंट आधार बेस असतो.आधारला कोणता मोबाईल क्रमांक जोडलेला असतो त्यानुसार पेमेंट त्या खात्यात जमा होतो. संबंधित पैसे साताऱ्यातील बँक खात्यात जमा झाले आहेत. याबाबत आम्ही अधिक चौकशी करत आहोत.
– संजय भालेराव (नायब तहसीलदार,पनवेल)

संबंधित प्रकार अतिशय धक्कादायक आहे.ज्या व्यक्तीने हे अर्ज भरले त्या व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज भरले असुन काही अर्ज अप्रुव्हड झाले असुन या व्यक्तीने ते पैसे लाटले आहेत.याबाबत आमच्याकडील सर्व पुरावे आम्ही पनवेल तहसील कार्यालयात सादर केले आहेत.पुजा प्रसाद महामुनी यांना त्यांचे पैसे मिळायलाच पाहिजेत.या योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.



Leave A Reply

Your email address will not be published.