लाडकी बहीण सप्टेंबरची रक्कम बद्दल नवीन अपडेट, अर्ज पडताळणी पूर्ण!

Ladki Bahin Application Form Verification


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मासिक दीड हजार रुपये मिळत आहेत. लातूर जिल्ह्यात दोन टप्प्यात जवळपास ५ लाख १९ हजार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यातील ८० टक्के लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ३ हजार रुपये आले आहेत. सप्टेंबरचा महिन्याचे दीड हजार कधी खात्यावर पडणार याची प्रतीक्षा लाभार्थ्यांना लागली आहे. राज्य शासनाकडून महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी अजूनही अनेक लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

लातूर जिल्ह्यात प्रशासनाकडून वेगवेगळ्या टप्प्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाची तत्काळ छाननी करून त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास ५ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात २ लाख ६७ हजार महिला योजनेसाठी पात्र ठरल्या. तसेच काही अर्जामध्ये  त्रुटी असल्याने हे अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले होते. दुसन्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया गतीने करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या, तसेच दुसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक ओडलेले नसल्याने जवळपास २० टक्के लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पडण्यात अडचण निर्माण झाली. ज्यांना पहिला पहिल्या टप्प्यात ३ हजार रुपये मिळाले ते आता तिसऱ्या महिन्यातील दीड हजारांच्या प्रतीक्षेत बसले आहेत.

टप्प्या टप्प्याने रक्कम जमा…

पहिल्या टप्प्यात ३ लाख २९ हजार अर्जाना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ६३ हजार लाभाथ्यांच अर्ज केवळ आधार सिडिंग नसल्याने फेल झाले होते. आता सिडिंग झाले असून, त्यांच्या खात्यावर ३ दिवसांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात १ लाख ९० हजार अर्ज मंजूर झाले, त्यापैकी जवळपास दीड लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम आली आहे.



2 Comments
  1. Akash rathod says

    Sir ladki bahniche ajun pan paise ale nahi ahe

  2. Kavita nitin kadam says

    Majhe ladki bahin yojanache paise aale nahit plzz help kra🙏🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.