नव्या वर्षात लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? माहिती आली समोर!
Ladki Bahin 2100 Payment Date 2025
आताच प्राप्त महत्वाच्या बातमी नुसार लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा अपडेट समोर आला आहे. बहुप्रतीक्षित रक्कम कधी पासून वाढणार या वारीं माहिती विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. महायुती सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. होती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने यात वाढ करुन ही रक्कम 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ही रक्कम वाढविण्यात आलेली नाही. डिसबेंरमध्ये 1500 रुपयांचाच हप्ता महिलांना मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रातीआधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. Ladki Bahin 2100/- Payment Date 2025 मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरुन अर्ज केलेत त्यांना या योजनेत लाभ मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी या योजनेबाबत एक मोठा दावा केला आहे. विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की, ही योजना केवळ निवडणुकीच्या हेतूने सुरू करण्यात आली होती आणि निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल. त्यामुळे एकच खळबळ माजली होती पण असे काही होणार नसल्याचे सुत्रांकडू सांगण्यात आले.