खुशखबर !! लाडकी बहिन योजना 10वा हफ्ता मिळायला सुरवात झाली ; बँक खात्यात 1500 रुपये जमा ! | Ladki Bahin Yojana: 10th Installment Released!

Ladki Bahin Yojana: 10th Installment Released!

महाराष्ट्र राज्य सरकारने “माझी लाडकी बहिन योजना” अंतर्गत 10वा हफ्ता मे महिन्यात वितरित करण्यास सुरुवात केली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये थेट डीबीटीद्वारे (DBT) जमा केले जात आहेत.

Ladki Bahin Yojana: 10th Installment Released!

योजनेच्या 10व्या हफ्त्यासाठी भरीव निधी
लाडकी बहिन योजनेच्या 10व्या हफ्त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 3960 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वितरित केले आहेत. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात अनेक महिलांना 8वा आणि 9वा हफ्ता मिळाला नव्हता, त्यामुळे मे महिन्यात त्यांना एकत्रित लाभ देण्यात येणार आहे.

एकत्रित तीन महिन्यांचे हफ्ते मिळणार!
माझी लाडकी बहिन योजना 10वा हफ्ता वितरणात महिलांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांचे हफ्ते एकत्रित दिले जाणार आहेत. यासाठी एकूण 4500 रुपये महिलांच्या खात्यात थेट जमा केले जाणार आहेत.

5 लाख महिलांचे अर्ज रद्द
विशेष बाब म्हणजे, राज्य सरकारने योजनेच्या अर्जांची छाननी केल्यानंतर 5 लाख महिलांचे अर्ज रद्द केले आहेत. या महिलांनी चुकीची कागदपत्रे आणि माहिती दिली असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या महिलांना 10व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही.

10वा हफ्ता कधी मिळणार?
अक्षय तृतीयेच्या दिवशी (30 एप्रिल) आणि महाराष्ट्र दिन (1 मे) बँका बंद होत्या, त्यामुळे मे महिन्यात 10वा हफ्ता वितरित करण्यात येत आहे. 3 मेपासून 10 मेपर्यंत दोन टप्प्यांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत.

पात्रता निकष:

  • महिला महाराष्ट्राची कायम रहिवासी असावी.
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असावा.
  • महिला आयकरदाता नसावी.
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
  • वय 21 वर्षे ते 65 वर्षांदरम्यान असावे.
  • ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन कुटुंबात नसावे.
  • संजय गांधी निराधार योजना लाभार्थी नसावी.

पैसे मिळाले की नाही हे कसे तपासाल?

  • ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • अर्जदार लॉगिनवर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल, तिथे लॉगिन करा.
  • मेनूमधून “Application made earlier” वर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल, तिथे “Actions” मध्ये रुपये चिन्हावर क्लिक करा.
  • तिथून आपले Ladki Bahin Yojana 10 Hafta Release Status तपासू शकता.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक पाऊल!
माझी लाडकी बहिन योजना ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना नियमित आर्थिक मदत मिळाल्याने त्यांचा जीवनमान सुधारेल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.