कोल्हापूरची परखत बाजी!-Kolhapur Tops in PARAKH!
Kolhapur Tops in PARAKH!
कोल्हापूरच्या पोरांनी कमाल केली बघा!” देशपातळीवर घेतलेल्या ‘परख’ शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्राला देशात ८ वा क्रमांक मिळालाय. पण विशेष म्हणजे कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी जोरदार कामगिरी करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय!
इयत्ता ३री, ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांवर घेतलेल्या मूल्यांकनात, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, मुंबई यासारख्या जिल्ह्यांनी बाजी मारली.
मात्र, सर्वसाधारणपणे पाहिलं तर माध्यमिक शिक्षणात अजूनही सुधारणा गरजेची आहे. गणित, विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये सरासरी तीन टक्क्यांची वाढ झाली असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पिछाडी कायम आहे. अकोला, नंदुरबार, गडचिरोलीसारख्या भागांत विद्यार्थ्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नाही.
या सर्वेक्षणात एक लाखाहून अधिक विद्यार्थी, १३,९३० शिक्षक आणि ४,३१४ शाळा सहभागी झाल्या. हा अभ्यास म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी एक आरसा ठरतोय – जिथं सुधारणा गरजेची आहे, तिथं उपाययोजना करणं हीच पुढची वाटचाल!