सरकारी नोकरीची सुवर्ण संधी ; यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती प्रक्रिया 2025!
Job Recruitment in Yavatmal Bank
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मागील बैठकीत झालेल्या कर्मचारी बदल्या आणि विविध समित्या नेमण्याचे निर्णय रद्द करण्यात आले. यामुळे बँकेच्या कारभारात मोठे बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नोकर भरतीवर संचालक मंडळाचे लक्ष
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच नोकर भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची चर्चा आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीचा मुद्दा गाजत असतानाच, यवतमाळ बँकेतही यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. बँकेच्या वर्तुळात सातत्याने नाट्यमय घडामोडी सुरू असून, या प्रक्रियेवर अनेकांचे लक्ष आहे.
अविश्वास ठरावानंतर नव्या हालचालींना वेग
फक्त १५ दिवसांपूर्वी बँकेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणला गेला होता. या घडामोडीनंतर आता संचालक मंडळाचे लक्ष आगामी नोकर भरतीवर केंद्रीत झाले आहे. बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी हालचालींना वेग आला असून, या भरती प्रक्रियेवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ही नोकर भरती प्रक्रिया निवडणुकीपूर्वी होणार असल्याने, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे पुढील काळात बँकेच्या निर्णयांवर आणि भरती प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.