आनंदाची बातमी ! गृह मंत्रालयात नोकरीची संधी-१,१८,५०० रुपये इतका मिळणार पगार !

Job Opportunity in the Ministry of Home Affairs

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची सुवर्णसंधी आहे. गृह मंत्रालयात (MHA) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. विशेष म्हणजे, या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७८,००० रुपये ते १,१८,५०० रुपये इतके  आकर्षक मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते.

Job Opportunity in the Ministry of Home Affairs

गृह मंत्रालयाने सिनियर कन्सल्टंट पदासाठी भरती जाहीर केली असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत mha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती व अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

पात्रता आणि अटी

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी डेप्युटी सेक्रेटरी किंवा डायरेक्टर या पदांवर काम केलेले असावे. तसेच, जर उमेदवार सरकारी कर्मचारी नसतील, तर त्यांच्याकडे MBA पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबतच, संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया

सिनियर कन्सल्टंट पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्जाचा नमुना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया, पहिला मजला, शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे पाठवावी लागतील. तसेच, उमेदवारांना अर्ज ई-मेलद्वारे सादर करण्याची देखील सुविधा आहे. यासाठी admn.del-cepi@govcontractor.in या मेल आयडीवर अर्ज पाठवता येईल.

ही नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करण्यास सुरुवात करावी. गृह मंत्रालयात नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी असून, स्थिर व उच्च वेतनाच्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी हे एक सुवर्णसंधीचे दार उघडले आहे.

तसेच, सरकारी नोकरीविषयक अधिक माहिती मिळविण्यासाठी news24.mahabharti.in या वेबसाईट ला रोज भेट दया.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.