जेईई दुसरे सत्र सुरू!-JEE Second Session Begins!

JEE Second Session Begins!

देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई परीक्षेच्या दुसऱ्या सत्राला आजपासून (२ एप्रिल) प्रारंभ होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वतीने आयोजित ही परीक्षा ९ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

JEE Second Session Begins!

NTA च्या वेळापत्रकानुसार, २ ते ४ एप्रिल दरम्यान बीई आणि बीटेकसाठीच्या पेपर-१ चा आयोजन होणार आहे. परीक्षेचे दोन सत्रे असतील – सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६. या परीक्षांसाठी वेळापत्रक २८ मार्च रोजी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यानंतर, ७ आणि ८ एप्रिल रोजी पुन्हा बीई आणि बीटेकसाठीच्या पेपर-२ ची परीक्षा होईल. ७ एप्रिल रोजी दोन सत्रांमध्ये, तर ८ एप्रिल रोजी एका सत्रात परीक्षा घेतली जाईल. शेवटच्या दिवशी, ९ एप्रिलला, बी.आर्च. आणि बी.प्लानिंग अभ्यासक्रमांसाठीच्या पेपर-२ए आणि २बी आयोजित करण्यात येतील.

जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्रे लवकरच उपलब्ध होतील. यंदा परीक्षा देशभरातील विविध शहरांसह १५ परदेशी शहरांमध्येही घेतली जाणार आहे. प्रवेशपत्रांवर बारकोड आणि QR कोड देण्यात आले असून, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि छायाचित्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.