मोठा बदल !! जेईई अॅडव्हान्स च्या नवीन पॅटर्नमध्ये प्रश्नसंख्या कमी !-JEE Advanced: Fewer Questions!

JEE Advanced: Fewer Questions!

नव्या पॅटर्नमध्ये जेईई अॅडव्हान्स्ड 2025 च्या परीक्षेत मोठा बदल बघायला मिळाला. मागील 10 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी प्रश्न विचारले गेले. एकूण 54 प्रश्न असलेल्या या परीक्षेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणित या तीन विभागांमध्ये प्रत्येकी 18 प्रश्नांचा समावेश होता. याआधीच्या वर्षांच्या तुलनेत 51 प्रश्न कमी होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळाला.

JEE Advanced: Fewer Questions!

पेपरची रचना:
18 मे रोजी आयआयटी आणि इतर राष्ट्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशासाठी दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. सकाळी 9 ते 12 पहिला पेपर आणि दुपारी 2.30 ते 5.30 दुसरा पेपर पार पडला. दोन्ही सत्रांमध्ये 180 गुणांचे मूल्यांकन करण्यात आले.

गेल्या वर्षांचा ताळेबंद:

  • 2015: 120 प्रश्न

  • 2020: 120 प्रश्न

  • 2016-2020: दरवर्षी 108 प्रश्न

  • 2021: 114 प्रश्न

  • 2023 आणि 2024: 102 प्रश्न

  • 2025: फक्त 54 प्रश्न

गेल्या 10 वर्षांतील हा सर्वात कमी प्रश्नांचा आकडा ठरला असून, यंदाची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी थोडी वेगळी अनुभवण्यासारखी ठरली. कमी प्रश्नांसह वेळेचे नियोजन अधिक सोपे झाले असले तरी, प्रश्नांचा दर्जा आणि काठिण्य पातळी कायम राखण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.