ISRO मध्ये भरतीची सुवर्णसंधी! – ISRO Recruitment 2025!

ISRO Recruitment 2025!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO (इस्रो) कडून एक महत्त्वाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इस्रोने दिलेल्या जाहिरातीनुसार एकूण ६३ पदं भरली जाणार आहेत. ही भरती शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ पदांसाठी आहे. या संधीचा उपयोग करून अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या तरुणांना देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात योगदान देता येणार आहे.

ISRO Recruitment 2025!

कुठल्या शाखेत किती पदं?

या भरतीअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स या शाखेत २२ पदं, मेकॅनिकल मध्ये ३३ पदं आणि संगणक शास्त्र या शाखेत ८ पदं उपलब्ध आहेत. हे सर्व पदं ‘शास्त्रज्ञ/अभियंता – एससी’ या श्रेणीअंतर्गत भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि GATE स्कोअर आवश्यक

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे BE/B.Tech पदवी असणं आवश्यक आहे. ती पदवी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल किंवा संगणक शास्त्र या शाखांमधील असावी. तसेच किमान ६५% गुण आवश्यक आहेत. याशिवाय, उमेदवाराकडे GATE स्कोअर असणंही अनिवार्य आहे.

वयोमर्यादा आणि आरक्षण

अर्जदाराचं किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावं लागेल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत मिळेल.

अर्ज फी आणि भरण्याची प्रक्रिया

सर्व श्रेणीतील महिला आणि पुरुष उमेदवारांना ₹२५०/- अर्ज शुल्क भरावं लागेल. हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम उमेदवारांनी ISRO च्या अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर जावं.
  • तिथे ‘Careers’ विभागात भरतीची लिंक मिळेल, ती क्लिक करा.
  • ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा आणि संपूर्ण माहिती भरा.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी, अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
Leave A Reply

Your email address will not be published.