इंजिनिअर झालेल्यांनो, तुमच्यासाठी एकदम जबरदस्त संधी आली आहे! भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी 320 शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ पदांसाठी भरती सुरू केलीय. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, आणि कंप्युटर सायन्स शाखांमधील उमेदवारांसाठी ही भरती आहे.
PRL साठीसुद्धा काही खास जागा आहेत. BE/B.Tech पूर्ण केलेले किंवा अंतिम वर्षात शिकणारे (2024-25) विद्यार्थी अर्ज करू शकतात, फक्त अंतिम निकाल 31 ऑगस्ट 2025 पर्यंत लागणे आवश्यक आहे. किमान 65% किंवा 6.84 CGPA असणं बंधनकारक आहे. भरती प्रक्रियेत प्रथम 120 मिनिटांची वस्तुनिष्ठ प्रकारातील लिखित परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना 1:5 च्या प्रमाणात इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल.
अर्जासाठी ₹750 भरावे लागतील, मात्र परीक्षा दिल्यास ही फी परत मिळेल – SC/ST, महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना पूर्ण ₹750 तर इतर सर्वांना ₹500 परत मिळतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2025 असून अर्ज isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन भरायचा आहे.
फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रं योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे. ISROसारखी संस्था म्हणजे स्वप्नातील नोकरी – आता वेळ न घालवता लगेच अर्ज करा आणि स्पेसमध्ये आपली जागा मिळवा!